एबीपी माझाशी बोलताना अपूर्वा जोशी यांनी यशाचे रहस्य उलगडले आणि फॉरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रातील अनेक पदर उलगडून दाखवले अगदी सोप्या शब्दात

फॉरेन्सिक अकाऊंटंट डॉ.अपूर्वा जोशी मुळच्या सोलापूरच्या. वाणिज्य शाखा घेतल्यानंतर जे टिपिकल करिअर ऑपशन्स असतात ते त्यांना नको होते. आणि त्याच शोधातून त्यांना अशी वाट सापडली आता आर्थिक घोटाळेबाजांना त्यांच्यापासून घाबरून राहावं लागतं.

देशभरातीलच नव्हे तर जगातील मोठमोठय़ा कंपन्या आणि बँकांमधील आर्थिक गैरव्यवहार त्यांनी शोधून काढले आहेत. सध्या ‘रिस्कप्रो मॅनेजमेन्ट कन्सल्टिंग’ या कंपनीच्या त्या संचालिका आहेत. आता फॉरेन्सिक अकाउंटंट नक्की करतो काय?, सीए पेक्षा ते कसं वेगळं आहे?, आणि मुळात सायन्सला पर्याय म्हणून वाणिज्य, कला या शाखांकडे बघण्याचा सर्रास दृष्टीकोन असतो, अशा वेळी वाणिज्य शाखेतली ही संधी किती मोठी आहे? याविषयी बोलण्यासाठी अपूर्वा आपल्यासोबत आहेत.