रेगटेक टाईम्स ने डॉ. अपूर्वा जोशी यांची मुलाखत घेतली होती. त्यांच्या कार्यावर नजर टाकण्यासाठी मराठी मध्ये रेगटेकटाईम्स ने पदार्पण केले आहे, आता इंग्लिश सोबतच रेगटेक टाईम्स मराठी मधून देखील उपलब्ध केला जाणार आहे.

अपूर्वा बद्दल थोड

फॉरेन्सिक अकौंटिंग क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या अल्प आहे. या क्षेत्रातील महिलांची संख्या तर अत्यल्पच. त्यातलेच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अपूर्वा जोशी. सध्या ती रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीची संचालक आहे.

वाणिज्य विद्याशाखेची पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर तिने सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली होती. फॉरेन्सिक अकौंटिंग क्षेत्रात तज्ज्ञांची वानवा असल्याचे लक्षात आल्यानंतर अपूर्वाने याच क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्टिफाईड फॉरेन्सिक अकौंटिंग प्रोफेशनल (सीएफएपी) आणि सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर (सीएफई) या अभ्यासक्रमानंतर तिने अमेरिकेत सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर अभ्यासक्रम पूर्ण केला. अपूर्वाने २०१२ मध्ये सोलापूर विद्यापीठासाठी फॉरेन्सिक क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमाची रचना करून दिली आहे. त्यानंतर देशभरातील अनेक संस्थांसोबत तिने काम केले. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यंची उकल करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी काम करतानाच तिने सुरू केलेली ‘फ्रॉड एक्स्प्रेस’ ही कंपनी नावारूपाला आली.  ‘फ्रॉड एक्स्प्रेस’ कंपनीच्या विलीनीकरणाचा रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीचा प्रस्ताव अपूर्वाने २०१३ मध्ये स्वीकारला. सध्या ही कंपनी देशातील बडय़ा कंपन्यांबरोबरच परदेशातील कंपन्यांनाही सेवा पुरवते. रिस्क्रप्रोचे कार्यालय बाणेर, पाषाण लिंक रस्ता, पुणे येथे असून, दुसरी शाखा नवी पेठेत आहेत. देशाबरोबरच परदेशातही शाखा सुरू करण्याचा अपूर्वाचा मानस आहे.

भारतातील फॉरेन्सिक अकौंटिंग क्षेत्रातील महत्त्वाचे नाव म्हणजे अपूर्वा जोशी. सध्या ती रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीची संचालक आहे. ही कंपनी देशातील बडय़ा कंपन्यांबरोबरच परदेशातील कंपन्यांनाही सेवा पुरवते. परदेशातही शाखा सुरू करण्याचा तिचा मानस आहे.